Views


*दीनदुबळ्या निराधार लोकांना किराणा किटचे 
वाटप, समाज विकास संस्था व जिजाऊ ब्रिगेड च्या माध्यमातून लोहारा तालुक्यातील निराधारांना आधार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अगोदर कोरोणा संकट आलं, त्यानंतर पावसाने थैमान माजवला आणि अशा परिस्थितीमध्ये लोहारा तालुक्यातील अनेक कुटुंबांना दिवाळीच सुद्धा साजरी करता आली नाही. कित्येक लोकांच्या घरी चुली सुद्धा पेटल्या नाहीत अशा दीनदुबळ्या गरीब लोकांसाठी एक मदतीचा हात म्हणून समाज विकास संस्था व जिजाऊ ब्रिगेड यांच्या माध्यमातून सामाजिक कर्तव्य बजावत समाजातील निराधार, अपंग, परितक्त्या, विधवा महिलांना अन्नधान्याचे किट वाटप करून जवळपास साठ निराधार लोकांना आधार देण्याचे काम केले आहे. यावेळी लोहारा तालुक्यातील नागराळ, मोघा, हराळी, हिप्परगा, सालेगाव 5 गावांमध्ये 60 लोकांना किराणा किट तसेच आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी समाज विकास संस्थेचे संस्थापक भूमिपुत्र वाघ, जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष रंजनाताई श्रीकांत हासुरे , श्रीकांत हसुरे, अभिजीत सूर्यवंशी, दगडू आसुरे, बालिका ताई मोरे, अदि, उपस्थित होते. यावेळी भूमिपुत्र वाघ सरांनी महिलांच्या हक्क अधिकार यावर प्रकाश टाकत महिलांना स्वतःचा अधिकार आणि हक्क जपता आले पाहिजेत आपण आपली ताकद ओळखली पाहिजे आणि त्या पद्धतीने कुटुंबामध्ये बरोबरीचा अधिकार मिळवला पाहिजे असे सांगितले. तर रंजनाताई हासुरे यांनी महिलांनी अर्थसत्ता, धर्मसत्ता, शिक्षण सत्ता, आणि राजसत्ता यामध्ये आपला सहभाग कसा नोंदवला पाहिजे आपण किती जागरूक राहिले पाहिजे, शासकीय योजना संबंधात आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे आपल्या गावात आजूबाजूला काय चालले आहे, याकडे उघड्या डोळ्यांनी आपण पाहिलं पाहिजे एखादी वर अन्याय झाला तर त्याच्या विरोधामध्ये आपल्याला आवाज उठवता आला पाहिजे, असे यावेळी सांगितले.
 
Top