Views


*डिकसळ मध्ये आता आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा  सरपंच अमजद मुल्ला यांच्या प्रयत्नांना यश....*

कळंब:-(प्रतिनिधी)
डिकसळ मध्ये आता आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा ; सरपंच अमजद मुल्ला यांच्या प्रयत्नांना यश कळंब शहराला लागूनच असणाऱ्या मौजे डिकसळ येथे मागील बऱ्याच दिवसापासून आठवड्यातून केवळ एक दिवस 45 मि. करिता पाणीपुरवठा होत होता. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनदेखील विनाकारण नागरिकांना पाणी कपातीस सामोरे जावे लागत होते या करिता डिकसळ ग्रामपंचायतचे सरपंच अमजद मुल्ला यांच्या वतीने कळंब न.प. उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती संजय मुंदडा यांना विनंती अर्ज केला असता त्यांनी नागरिकांना होत असणारी अडचण लक्षात घेत तात्काळ आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यासाठी लेखी आदेश काढले यामुळे आता डिकसळ करांना आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे या बाकीचे सर्व लोक आतून कौतुक होत आहे.
 
Top