Views




*श्रीराम जन्मभूमी जनजागरण आणि निधी संकलन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्राचे जन्मस्थानी भव्य राम मंदिर उभारणी यासाठी तसेच त्यासाठी निधी संकलन आणि संपर्क उस्मानाबाद जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन मोक्षदा एकादशी गीता जयंतीच्या निमित्ताने दि. 25 डिसेंबर रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य महंत महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते तसेच महंत मावजी नाथ बुवा , महंत वेंकट अरण्यगिरी महाराज, श्री सोमनाथ सुडके महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. उस्मानाबाद शहरात नगरपालिके समोरील शॉपिंग सेंटरमध्ये झालेल्या या जनजागरण आणि निधी संकलन संपर्क कार्यालयाचा उद्घाटन प्रसंगी महंत मावजी नाथ बुवा यांनी प्रभू श्रीरामाच्या राम मंदिराची उभारणी म्हणजे हिंदू तेज , अस्मिता जागी करण्याची संधी असून सर्व हिंदू बांधवांच्या सहभाग यासाठी गरजेचा असल्याचे सांगितलं. निधी संकलनासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले. श्री सोमनाथ सुडके महाराज यांनी प्रभू श्रीराम यांनी अवतार घेतला नसता तर मानव जमात दिसली नसती , प्रभू रामचंद्राचे मानवजातीवर उपकार आहेत , समस्त मानव यांनी एकत्र येऊन भव्य मंदिर निर्माणासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराला आणि साधुसंतांच्या आवाहनाला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी चव्हाण यांनी केले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे श्री दत्तात्रेय चौरे , जिल्हा मंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी तसेच जिल्हा समितीचे सहसचिव विजय वाघमारे तसेच अनेक रामभक्त उपस्थित होते.
 
Top