Views




*पीएम किसान सन्मान निधीने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 पीएम किसान निधी अंतर्गत 9 कोटी शेतकरी कुटुंबीयांना त्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपयांचे हस्तांतरण करण्यात आले. त्यानंतर देशातील नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या संवाद कार्यक्रमाचे उस्मानाबाद शहरातील प्रतिष्ठाण भवन येथे दि.25 डिसेंबर 2020 रोजी प्रक्षेपण केले गेले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवादाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा बुद्धिजीवी प्रकोष्ट प्रदेश सहसंयोजक, लातूर शहर जिल्हा प्रभारी दत्ता भाऊ कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, प्र.का.स.अॅड.खंडेराव चौरे, सतीश दंडनाईक, जिल्हा सरचिटणीस अॅड. नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, राहुल काकडे, प्रवीण पाठक, लक्ष्मण माने, दाजीप्पा पवार, प्रवीण सिरसाठे, सुनील गवळी, अजय यादव, श्रीराम मुंबरे, प्रमोद बचाटे, नरेन वाघमारे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top