Views


गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन इयंगर यांची जयंती साजरी 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात गणित विभागामार्फत भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन इयंगर यांचा जन्मदिन गणितदिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. एक महान गणितज्ञ तथा अलौकिक गणिती होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात गणिताचाच विचार केला. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची मंगळवार दि.22 डिसेंबर 2020 रोजी जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार, प्रा.डॉ.राम बजगिरे, प्रा.करबसाप्पा ब्याळे, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.रवि आळंगे, डॉ.शीला स्वामी, डॉ.सुधीर पंचगल्ले, डॉ.महादेव कलशेट्टी, डॉ.महेश मोटे, डॉ.संध्या डांगे, डॉ.जयश्री सोमवंशी, प्रा.दयानंद बिराजदार, गाणित विभागातील प्रा.डॉ.सोमनाथ बिरादार, डॉ.राजकुमार देवशेट्टे, डॉ.अरुण बावा आदींच्या प्रमुख उपस्थितीत जयंती साजरी केली. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
 
Top