Views

*महावितरणच्या वतीने कानेगाव येथे एक गाव एक दिवस मोहिम राबविण्यात आली*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 उपविभाग महावितरण लोहारा यांच्या वतीने तालुक्यातील कानेगाव येथे एक गाव एक दिवस मोहिम राबविण्यात आली. कानेगाव येथे मेंटन तार ओढण्यात आल्या व विज चोरी करणाऱ्या ग्राहकावर कार्यवाही करून वीज चोरी करू नये असे सुचना देण्यात आल्या. आकडे टाकुन विना परवाना विज वापरणाऱ्या चे आकडे यावेळी काढण्यात आले. घराच्या आतिल मिटर घराच्या बाहेर काढुन लावण्यात आले. सिंगल फेस डि.पी.ची खराब झालेले केबल किटकेट काढण्यात आले. गावातील ताराखालील झाडे तोडण्यात आले. हि मोहिम प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद व्यवस्थापक यांच्या आदेशा वरून पथक तयार करून राबविण्यात आली. या पथकात सहाय्यक अभियंता राम दिक्षीत यांच्या मार्गदर्शनाखाली कानेगाव गावचे लाईनमन नसरूद्दीन शेख, के.एम.मंडलीक, एस.एस. साळुंके, एन. बी.पटेल, एल.पी. लांडगे, एस.बी.भांगे, एल.पी.उदारे, एस.एम.पवार, सचिन काळे, डि‌.बी.सोनवने, या सहभागी होते. यावेळी महावितरण च्या वतिने लोहारा युनिट मधून कानेगाव येथे एक गाव एक दिवस मोहिम राबविण्यात आली. नागरीकांनी विज चोरी करु नका, ज्याचे डिंमाड नाहित यांनी कागदपत्र सादर केल्यास तात्काळ त्यांना डिमाड भरुन नवीन विज पुरवठा केला जाईल व थकित विज बिल भरून \ सहकार्य करावे असे, आवाहान लाईनमन नसरूद्दीन शेख यांनी केले.

 
Top