Views


*होमगार्डच्या सन्मानार्थ, महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ..समाजसेवक रामलिंग पुराणे करणार, राज्यभर मुंडन करून अर्धनग्न आंदोलन..! 24 डिसेंबर वर्धा, 26 डिसें औरंगाबाद, 28 डिसें पुणे येथे आंदोलन, पुढे मुंबई कडे* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

महाराष्ट्रातील होमगार्ड अनेक समस्यांनी ग्रासले आहेत, वेळेत मानधन नाही, कामाची उपलब्धी असून काम नाही, महिलांना कोरोनाला काळात काम नाही, वय वर्षे 45 वरील होमगार्ड घरी बसवण्यात आले, अनेक लोकांना विविध कारणे दाखवत अपात्र ठरवण्यात आले, असे अनेक समस्या व संबधित होमगार्ड महासमादेशक कार्यालयातून महाराष्ट्रातील होमगार्डना जाणून बुजून वेठीस धरण्यात येत असून याबाबत बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी वेळवेळी शासन दरबारी पाठपुरावा करून होमगार्ड समस्या सोडवण्यासाठी विनंती केली आहे. 24 फेब्रुवारी 2020 रोजी आझाद मैदान मुंबई येथे होमगार्डच्या विविध मागण्या घेऊन बसव प्रतिष्ठाणच्या वतीने समाजसेवक तथा अध्यक्ष रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे 2 दिवसीय आंदोलन झाले होते या आंदोलनास संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 20 ते 25 हजार होमगार्डनी समर्थनात सहभाग नोंदवला होता. अखेर 25 फेब्रुवारी 2020 रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या भेटीनंतर व आपले मागण्या रास्त असून मंजूर करायला हरकत नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशना नंतर बसव प्रतिष्ठाण च्या शिष्ट मंडळा सोबत बैठक लावू या आश्वासनंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन परिस्थितीत होमगार्डचे मागण्या प्रलंबित राहिले तरीही लॉक डाऊन मध्येही बसव प्रतिष्ठाणचा पाठपुरावा चालूचा होता. दि.19 नोव्हेंबर 2020 रोजी बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी राज्याचे मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री व संबधित कार्यालयाकडे एक निवेदन पाठवण्यात आले असून दि.24 डिसेंबर पासून संपूर्ण राज्यभर "होमगार्डच्या सन्मानार्थ, सरकारच्या निषेधार्थ" मुंडन करून अर्धनग्न आंदोलन छेडण्याचे ईशारा दिला आहे. आपल्याला गेले जाने-फेब्रुवारी 2020 पासून आजतागायत होमगार्ड समस्या सोडवणे बाबत अनेक निवेदने देण्यात आले, परंतु दरवेळी संबधित होमगार्ड कार्यालयातुन महासमादेशक यांच्या कडून आवाहल प्राप्त झाले नाही,आवाहल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले, परंतु अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही आणि राज्यातील होमगार्ड समस्या अद्याप सुटले नाहीत. आपल्याला वारंवार निवेदने देऊन वेळवेळी पाठपुरावा ही करण्यात आले पण त्याची शासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे राज्यातील होमगार्डवर उपासमारीची वेळ आली. दिवाळी ना दिवाळी तुम्ही अंधारात ढकललात याला कारणीभूत कोण? 24 फेब्रुवारी आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन आणि 25 फेब्रुवारी 2020 रोजी मा.गृहराज्यमंत्री सतेज पाटील साहेब यांच्या भेटीनंतर व मागण्या रास्त असून मान्य करायला हरकत नाही आणि अर्थसंकल्प अधिवेशन नंतर बैठक लावू या आश्वासन नंतर आम्ही आंदोलन मागे घेतलो, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काही ठप्प झालं हे आम्हालाही मान्य आहे, पण आता तरी बैठकीचे तारीख देण्यात यावे. जो पर्यंत राज्यातील होमगार्ड समस्या सुटणार नाहीत तोपर्यंत वेतनधारी कर्मचारी जर या काळात निवृत्त होत आहेत किंवा झाले असतील त्यांना शासनाच्या निवृत्ती नंतरचे कोणतेही योजना लागू करू नये ही विनंती, जो पर्यंत त्यांच्या कालावधीतील प्रलंबित कामे पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत त्यांचे कसल्याही प्रकारचे फुल अँड फायनल सेटलमेंट करू नये ही विनंती. आजही होमगार्ड मागण्या प्रलंबित आहेत आणि त्याबाबत शासनाला वेळोवळी कळवण्यात ही आले आहे, येणाऱ्या एक महिन्यात त्यावर कारवाई करण्यात यावे अन्यथा संबधित होमगार्ड समस्या जो पर्यंत सुटणार नाहीत तो पर्यंत आम्ही राज्य शासनाच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात जनजागृती आंदोलनाच्या माध्यमातून दि.24 डिसेंबर 2020 पासून "होमगार्ड सन्मानार्थ, सरकारच्या निषेधार्थ" मुंडन करून मी स्वतः रामलिंग पुराणे अर्धनग्न आंदोलन आंदोलन छेडत आहे, आणि त्याला पूर्णपणे आपले शासन जबाबदार राहील. असे निवेदनात नमूद आहे.
वर्धा, औरंगाबाद, पुणे, जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनाही दि.9 डिसेंबर रोजी ई-मेल ने पत्र पाठवून आंदोलनाबाबत कळवले असल्याचेही रामलिंग पुराणे यांनी सांगितले.
*काय आहेत मागण्या:-
1) विविध कारणांनी अपात्र होमगार्डना त्वरित विनाअट कामावर रुजू करून घ्यावे, 2) कायमस्वरूपी 365 दिवस कामावर घ्यावे/किंवा आदींच्या सरकारने देऊ केलेले 180 दिवस काम पूर्वरत करणे
3) बंदोबस्त मानधन आठवडाभरात द्यावे, 
4)पोलीस खात्यातील 5% आरक्षण वरून 15% आरक्षन करावे, 
5) तीन वर्षांनी होणारी पुनरनोंदनी/पुनर्नियुक्ती पध्द्त बंद करावे, 
6) जिल्हा समादेशक/मानसेवी पद पूर्वरत ठेवावे, आंदोलकावरील झालेली कार्यवाही त्वरित मागे घ्यावे 
7) विविध कारणांनी कामावरून काडून टाकण्यात आलेल्या समादेशक/इतर अधिकाऱ्यांना परत नियुक्ती द्यावे.
8) पोलीस प्रशासनास जी आपत्तीजनक विमा रक्कम मंजूर आहे त्यात होमगार्डचा ही समावेश करावा.
9) 30 जुलै 2009 च्या शासन निर्णयात बदल करून २ लक्ष रुपये विमा ऐवजी 2020 च्या चालू महागाई नुसार 20 लक्ष रुपये करावे व तसेच परिवाराला लघु उद्योग साठी तात्काळ देण्यात येणारे 10 हजार रुपये ऐवजी 1 लाख रुपये देण्यात यावे व त्यांच्या पाल्याचा शिक्षण खर्चही वाढवून द्यावे.
10) प्रशिक्षण घेऊनही अद्याप त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले नाहीत, त्यांना पोलीस भरतीत आरक्षण नुसार समाविष्ट करून घ्यावे.
11) महासमादेशक यांनी नेमलेली तीन सदस्यीय समिती रद्द करून नवीन समिती नेमणे ( ही नवीन मागणी)
आदींच्या सरकारने 180 ते 200 दिवस काम देऊ केले होते, परंतु महाविकास आघाडी सरकार आल्यावर होमगार्डकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने समस्या कमी होण्या ऐवजी समस्या वाढत आहेत, फक्त निधीची पूर्तता करून समस्या सुटणार नाहीत तर संबधित कार्यालयाच्या कामकाजात ही लक्ष देणे गरजेचे आहे, संबधित कालावधीतील महासमादेशक यांच्यावर कडक कारवाई करून होमगार्ड समस्यां शासनाने सोडवावे अन्यथा शासनाच्या विरोधात संपूर्ण राज्यभर आमचे आंदोलन चालूच राहतील -- समाजसेवक रामलिंग पुराणे
 
Top