*मंदिरे उघडा अन्यथा ताळे तोडून दर्शनासाठी उघडी करू -- संयोजक महेश कुंभार*
उस्मानाबाद:-( इकबाल मुल्ला)
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल लोहारा यांच्यावतीने लोहारा येथील श्रीराम मंदिर येथे दि.24 ऑक्टोंबर 2020 रोजी आरती करून व ढोल वाजवून मंदिर उघडण्यासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. कोरोना या जागतिक महामारीच्या संकटामुळे मागील 8 महिन्यांपासून मंदिर, दुकाने बंद होती. परंतु केंद्र सरकारने मंदिर उघडण्याची परवानगी दिली असल्याने सध्या देशातील इतर राज्यात सर्वच मंदिरे सुरू करण्यात आलेले आहेत. तर फक्त महाराष्ट्रातच भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिर बंद का? असा सवाल करत व उत्सवकाळात मंदिरे बंद असल्याने "ढोल वाजवा - महाराष्ट्र सरकार जागवा" असे आंदोलन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात केले. शासनाने मंदिर बंद व दारूचे दुकाने चालू करण्याचा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रातील भाविक जनतेच्या भावनांचा विचार करून विजयादशमीच्या शुभ दिवसापासून मंदिर उघडण्याचा आदेश शासनाने देवून केलेली चूक सुधारावी, अन्यथा येणाऱ्या काळात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल तसेच मंदिराचे ताळे तोडून दर्शन घेण्यासाठी मंदिरे उघडी करू, असे संयोंजक महेश कुंभार यांनी सांगितले. यावेळी बजरंग दल संयोजक महेश कुंभार, शंकर जाधव, रोहित लोळगे, शहाजी जाधव, दत्ता पोतदार, सुमित झिंगाडे, मुरलीधर होनाळकर, बालाजी चव्हाण, ज्ञानेश्वर लोखंडे, विरेश स्वामी, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.