Views


 *अत्याचारीत स्त्रीला न्याय मिळावा -- भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.लक्ष्मी पांचाळ*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अत्याचारित स्त्रीला न्याय मिळावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडी उमरगा तालुकाध्यक्षा सौ.लक्ष्मी पांचाळ यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा तालुका येथे लक्ष्मी पाटी जवळील वीटभट्टीवर काम करणाऱ्या पारधी समाजातील आदिवासी महिलेवरती लैगिंक अत्याचार झाला. त्याची तक्रार पोलीस ठाणे उमरगा येथे देऊनही आज पर्यंत आरोपींना अटक झाली नाही. एकीकडे राज्य सरकार नको त्या गोष्टीवर नाक खुपसून इतर राज्यातील प्रकरणावर विनाकारण बडबड करीत आहे. पण आपल्या राज्यात अशा पारधी समाजातील आदिवासी महिलेवर अत्याचार होत आहेत. ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून पीडीत गरीब महिलेला न्याय द्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ.लक्ष्मी पांचाळ, सौ.तेजाबाई, सुरेखा पंचाळ, बेबी मनियार, आदि, उपस्थित होत्या.

 
Top