Views


*जिल्ह्यातील प्रत्येक गावात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येणार-जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे...*

*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)* 

कोरोना साथरोगामुळे होणारा मृत्यु दर कमी करणेच्या अनुषंगाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम जिल्हयात राबविण्यात येत आहे. यात प्रत्येक गाव व वार्ड पातळीवर आरोग्य व स्वयंसेवकाच्या पथकामार्फत घरोघरी तपासणी केली जाणार आहे. यात जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सभापती ,उपसभापती यांची भुमिका अत्यत महत्वाची असुन त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे व उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी केले आहे. 
  या मोहिमची सविस्तर माहिती देण्यासाठी व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सुचना घेणेसाठी व्हीसी मार्फत दि.16 सप्टेंबर 2020 रोजी  3 वाजता संवाद सत्र ठेवण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी मार्गदर्शन केले
   तसेच यावेळी आरोग्य सभापती धंनजय सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हयात मृत्यु दर वाढत असुन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गाव पातळी पासुन चळवळीच्या स्वरूपात योजना राबविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यात स्वयंसेवकांची नेमणूक करणे लोकांमध्ये जनजागृती करणे व अम्बुलन्स अथवा वाहनाची व्यवस्था करणेचेही आवाहन केले आहे.
        यावेळी दत्ता आण्णा माळूके सभापती, जिल्हा परिषद सदस्य श्री. धिरज पाटील श्री महेंद्र काका धुरगुडे, शितल पाटील, रफिक तांबोळी ,श्री. प्रकाश आष्टे, श्री प्रकाश चव्हाण व इतर सदस्यांनी ही सुचना व मते मांडली व ही मोहिम यशस्वी करणेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, असे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी कळविले आहे
 
Top