Views


कोरोना काळात पत्रकारांना विम्याचे कवच देण्याची मागणी

मयत पत्रकारांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत करा

कळंब:-(प्रतिनिधी)

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची मदत द्या,तसेच या काळात योद्धा म्हणून काम करणाऱ्या इतर पत्रकारांना सुद्धा विमा कवच द्या,या मागणी चे निवेदन कळंब तहसीलदार मार्फत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना या मागणीचे निवेदन कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी दिले आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत देण्याचे जाहीर केले होते.मात्र अद्याप कोणतीही मदत प्राप्त झाली नाही.त्यामुळे मयत पत्रकारांच्या नातेवाइकांना मदत तातडीने देण्यात यावी,तसेच इतर पत्रकारांनाही या मदतीचा लाभ व्हावा, सर्व पत्रकारांना पन्नास लाख रुपयाचे विम्याचे कवच देण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली.
कोरोना काळात पत्रकार आपल्या परिवाराचा विचार न करता योद्धा म्हणून काम करत आहेत.सर्वांचे आपल्या लेखणीतून प्रबोधन करत आहेत.मात्र अशा पत्रकारावर नेहमी शासनाचे दुर्लक्ष झाले आहेत.त्यामुळे कोरोना सारख्या संकटकाळात तरी शासनाने पत्रकारांच्या पाठीशी राहावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर परमेश्वर पालकर, माधव सिंग राजपूत,कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक, सतीश टोणगे, अशोक शिंदे,शितलकुमार घोंगडे,अमर चोंदे, दिलीप गंभीरे , मुस्तान मिर्झा, बालाजी निरफळ , शिवप्रसाद बियाणी,बालाजी सुरवसे , रमेश अंबिरकर, ज्ञानेश्र्वर पतंगे, ओंकार कुलकर्णी, मंगेश यादव, सतीश मातने, परवेज मुल्ला, अनिल गाडे, शिवाजी बोबडे,रमेश रितापुरे,राजे सावंत,राजेंद्र मुंदडा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या वेळी कळंब तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य हजर होते.
 
Top