Views


निर्यातबंदी लादल्याने शेतकऱ्यांचे नुकसान ,कांद्यावरील बंदी उठवा

*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)*

भूम कांद्यावर निर्यातबंदी लादल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.त्यामुळे कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी कृषि पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली.यासंबंधी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
        निवेदनात म्हटले आहे की, अगोदरच कोरोनामुळे शेतकरी संकटात आहे.त्यात केंद्र सरकारने 14 सप्टेंबर रोजी कांदा निर्यात बंदी जाहीर केली. त्यामुळे कांद्याचे दर पडणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन तो पुन्हा आर्थिक कोंडीत सापडणार आहे .शेतकरी सुखी झाला तरच ईतर सुखी होतील.सध्या कांद्याला चांगले भाव आहेत.त्यामुळे कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी.
निवेदनावर तालुकाध्यक्ष आकाश डोके,विद्यार्थी सेल तालुकाध्यक्ष संजित मुंडे,कार्याध्यक्ष विठ्ठल देशमाने आदींच्या स्वाक्षरी आहेत यावेळी रोहित आडागळे,कृष्णा मुंडे,महेश पुरी,श्रीकांत नायकिंदे,तुषार किलमिसे,प्रल्हाद गोरे ,सुनील मुंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top