Views


*उस्मानाबाद जिल्ह्यात सततच्य पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पंचनामे करण्याची  कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेची मागणी....* 

*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)*

उस्मानाबाद जिल्ह्यात सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे लवकरात लवकर पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेने उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. 
या निवेदनात म्हटले आहे की , कोरोनाच्या काळात उस्मानाबाद  जिल्ह्यातील शेतकरी  दुहेरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामात  भरगोस उत्पन्नाची आशा करणाऱ्या शेतकऱ्यांचा ऐन काढणीच्या काळात सलग आठ दिवस अवेळी आलेल्या पावसामुळे हतातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे पावसाचे पाणी हे सोयाबीन पिकात साचून काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. पिकात पाणी साचून शेंगा पाण्यात राहत असल्याने त्या खराब झाल्या असुन सोयाबीन शेगांना कोंब फुटत आहेत, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असुन आर्थिक संकटात सपडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे.
उस्मानाबाद जिल्हा कृषि पदवीधर युवाशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही  मागणी करण्यात आली यावेळी युवती जिल्हाध्यक्षा पुजा कुलकर्णी -पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप अडसुळ, युवती जिल्हा उपाध्यक्षा स्वप्नाली सुरवसे,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विश्वतेज पवार, जिल्हा संघटक करण शिंदे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुशांत क्षीरसागर, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष चैतन्य सुपेकर,  उस्मानाबाद तालुकाध्यक्ष हरीष देशमुख, उस्मानाबाद तालुका कार्याध्यक्ष अभिषेक इसाके, उस्मानाबाद विद्यार्थी तालुकाध्यक्ष समर्थ हुग्गे, युवती तालुकाध्यक्ष रक्षंदा रनखांब, युवती तालुका उपाध्यक्ष ऋतुजा गायकवाड, व जयंत लावंड आदी  उपस्थित होते.

 
Top