Views


मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणाऱ्या कंगणा राणावतचा  शिवसेनेच्या वतीने परंडा येथे जाहीर निषेध....

उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा शहरात मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देत पोलिसांवर अविश्वास दाखविणाऱ्या कंगणा राणावतचा  शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला, अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई व मुंबई पोलिस बद्दल अपमानकारक वक्तव्य केल्या बद्दल परंडा शहरात जाहीर निषेध करण्यात आला
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके,शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव,युवा नेते रणजित पाटील, उमेश परदेशी,कुणाला जाधव, बालाजी नेटके, अशोक गरड, धर्मा जाधव,आणा लिमकर, धनाजी शिंदे,बुद्धिवान गोडगे,व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top