Views


भाजपा नूतन जिल्हा पदाधिकाऱ्यांचा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकारी यांचा सत्कार भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे नवनिर्वाचित पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस (संघटन) ॲॅड. नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस आदमभाई शेख, उस्मानाबाद शहराध्यक्ष राहुल काकडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष सिताराम वनवे, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बुद्धीजीवी प्रकोष्ट संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सुबोधसिंह ठाकुर, विठ्ठल तिपाले, उमाकांत गोरे, अजित काकडे, समिर पठाण, संकेतसिंह ठाकूर, प्रमोद लिमकर, बाळासाहेब गोडगे, अविनाश विधाते, सुरज काळे, सिध्दीक हन्नूरे, अभय देशमुख, गौरव पाटील, आदी, उपस्थित होते.

 
Top