Views




होळी येथील कंत्राटी कर्मचारी अक्षय गायकवाड विद्युत डीपी वर काम करीत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला, भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी यांच्या घरी जाऊन सांत्वन केले


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील होळी येथील कंत्राटी कर्मचारी अक्षय गायकवाड वय 25 वर्षे हे गावच्या ओड्या शेजारील डीपी मध्ये बिघाड झाल्यामुळे काम करीत होते. काम करीत असताना विजेचा शॉक लागून यांचा जागीच मृत्यू झाला होता. यांच्या घरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल (दादा) पाटील, भाजपा लोहारा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दि.28 सप्टेंबर 2020 रोजी भेट देऊन परिवारांचे सांत्वन करून तुमच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी सदैव तयार आहे, असे सांगितले. यावेळी भाजपा युवा माजी तालुकाध्यक्ष प्रविण चव्हाण, विध्यार्थी आघाडी तालुका उपाध्यक्ष पवन मोरे, शिवशंकर हात्तरगे. विनोद मोरे, अक्षय बिराजदार, युवराज कोकाटे, ईश्वर बिराजदार, गणपती गायकवाड, यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

 
Top