Views
आ.सुजितसिंह ठाकूर व यांच्या कुंटुंबातील व्यक्ती कोरोनातुन लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेत रूजु व्हावे यासाठी, ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवत महादेवाला दुग्धाअभिषेक घालून प्रार्थना

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर  यांच्यासह कुंटुंबातील सदस्यांची दि.9 आॕगस्ट 2020 रोजी कोरोना टेस्ट पाॕझीटीव्ह आली. त्यांच्यासह कुंटुंबातील व्यक्ती लवकरात लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेत रूजु व्हावे, यासाठी लोणी येथील ग्रामदैवत महादेवाला ग्रामस्थांच्या वतीने सोशल डिस्टन्सींग चे पालन करुन दुग्धाअभिषेक घालून प्रार्थना केली. यावेळी भाजपाचे नेते सुखदेव टोंपे, हभप कुमार केमदारणे, धनाजी केमदारणे, दगडू केमदारणे, मेजर रामेश्वर, भोळ, भाऊसाहेब केमदारणे, सुभाष शिंदे, तानाजी केमदारणे, यांच्यासह गावातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

 
Top