Views


बेंबळी येथे सीसीसी सेंटर सुरु करण्यासाठी पहिले पाऊल ;
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून जागेसाठी हिरवा कंदील

 
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
बेंबळी येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे साहेबांनी भेट देऊन जागेची पाहणी केली. त्यांनी दक्षता फाउंडेशनच्या वतीने दाखवलेल्या जागेला हिरवा कंदील दाखवला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे सद्यस्थितीत 14 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सात रुग्णांवर सध्या उस्मानाबाद येथे उपचार सुरू आहेत. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे बेंबळी येथे दक्षता फाउंडेशनच्या वतीने पुढाकार घेऊन कोव्हीड केअर सेंटर अर्थात सीसीसी सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 50 बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दि.26 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे  यांनी भेट दिली. त्यांनी दक्षता फाउंडेशनच्या वतीने दाखवलेल्या जागेची पाहणी केली. जिल्हा परिषद माध्यमिक प्रशालेत सेंटर सुरू करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. इमारत पाहून त्यांनीमराठी सीसीसी सेंटर सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल सूर्यवंशी, पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी गावडे, सामाजिक कार्यकर्ते नवाब पठाण, दक्षता फाऊंडेशनचे अध्यक्ष गालिब पठाण, उपाध्यक्ष नितीन खापरे पाटील, सचिव श्यामसुंदर पाटील, पत्रकार ॲड. उपेंद्र कटके, गोविंद पाटील, रणजित बरडे, नंदकुमार मनाळे, अतिक सय्यद, बालाजी माने, सुनील वेदपाठक, गुड्डू लक्ष्‍मण सोनटक्के, इरफान जमादार, मजहर पठाण आदी उपस्थित होते. कोव्हीड केअर सेंटरला संपूर्ण सहकार्य जिल्हा परिषद सदस्य राजनंदिनी कोळगे यांचे पती तथा ज्येष्ठ भाजप नेते राजाराम कोळगे यांनी दक्षता फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
 
Top