Viewsपोलीस हेडकॉन्स्टेबलला मिळाला वाढदिवसाच्या  दिनीच   ध्वजारोहणाचा मान.
 
 कळंब :-(प्रतिनिधी)
  
तालुक्यातील येरमाळा येथे स्वतंत्र्य दिन कोरोना विषाणू संवसर्गामुळे अत्यंत  साध्या पद्धतीने साजरा होत असताना आपल्या जन्म दिवसाचे व सेवा निवृत्ती जवळ आल्याने आयुष्यात भारतीय तिरंग्याचा ध्वजारोहण करण्याच्या मान मिळणे प्रत्येक भारतीयासाठी स्वप्न असते ही मोठी अभिमानाची गोष्ट असते. हा मान येरमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी ठाण्याचे पो. ह. कॉ. रामदास मरीबा भालेराव यांना दिला.
      आपल्या कार्यालयातील वरिष्ठांनी ही संधी दिल्याने कर्मचाऱ्याला ध्वजरोहन करताना गहिवरुन आले.आजचा स्वातंत्र्य दिनाचा  प्रसंग सर्वच कर्मचाऱ्यांना नक्कीच कांहींसा वेगळा वाटला.
उस्मानाबाद पोलीस दलात गेल्या ३२ वर्षांपासून सेवा देत असलेले आणि सद्या येरमाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास मरीबा भालेराव हे येत्या ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होणार आहेत.तर आज स्वतंत्र दिनाच्या दिवशीच त्यांचा वाढदिवस सुद्धा असतो. त्यामुळे गेल्या ३२ वर्षे पोलीस दलात सेवा देणाऱ्या भालेराव यांना पोलीस ठाण्यातील ध्वजारोहण करण्याचा मान सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी दिला.
३२ वर्षातील सेवेत पहिल्यांदाच आणि तेही वाढदिवसाच्या दिवशी आपल्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्याने भालेराव हे भावुक झाले.तर त्यांचे डोळेही पाणावले.तर याचवेळी इतर कर्मचारी यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पोलीस दलातील दिलेल्या सेवेबद्दल अभिनंदन करत,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.दरवर्षी आपण ध्वजारोहण करतोच.परंतु आपल्या पोलीस ठाण्यात कार्यरत आणि पोलीस दलात अखंड ३२ वर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तिच्या वेळी व वाढदिवसाच्या दिवशी ध्वजारोहण करण्याची संधी दिल्याचा आनंद काही वेगळाच आहे.अशी प्रतिक्रिया रामदास भालेराव यांनी या वेळी बोलताना दिली. 
Top