Views


उस्मानाबाद जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याने जिल्हा रुग्णालयात पाच तज्ञ डॉक्टरांची टिम दाखल होणार

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर कोरोनाबाधित झाल्याने मनुष्यबळाची मोठी कमतरता निर्माण झाली होती, त्यामुळे निर्माण होत असलेल्या अडचणीविषयी पालकमंत्री शंकरराव गडाख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित भैय्या देशमुख व विभागीय आयुक्त सुनिल केंद्रकर यांच्याशी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फोन वरून चर्चा केली होती. त्या चर्चेतुन जिल्ह्यासाठी अतिरिक्त पाच तज्ञ डॉक्टर देण्याचे मान्य करुन तातडीने पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
     शासकीय विश्रामगृह, शिंगोली (उस्मानाबाद) येथे कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आढावा बैठक  घेण्यात आली होती. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात रुग्ण पॉझिटिव्ह जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. प्रामुख्याने माणसांच्या आयुष्याला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी कंटेन्टमेंट झोन करावेत. यामध्ये कडक पोलीस बंदोबस्त अंमलबजावणी करण्यात यावी, कोरोना टेस्टची संख्या वाढवाव्या व जास्तीत जास्त बेड तयार करण्याच्या व जिल्हा रुग्णालयमध्ये चांगल्या दर्जाचा नाष्टा, जेवण देण्याचा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 
या बैठकीला आमदार कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड, पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण, तहसीलदार गणेश माळी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गाढवे-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
Top