Views


कळंब शहरात जनता कर्फ्यु ची कडक अंमलबजावणी होईल-उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ

कळंब:-(प्रतिनिधी)
कळंब शहरातील कोरोना वाढती संख्या लक्षात घेता व कोरणा बाधित अशी गावातील अनेक लोकांचा संपर्क आलेला आहे. त्यामुळे शहराचे नगर परिषद पदाधिकारी स्थानिक व्यापारी संघटना नागरिक प्रशासन यांनी संयुक्तपणे शहरात उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. जनता कर्फ्यू पुढीलप्रमाणे पाळा जाईल.

🔴सोमवार(दि.03) ऑगस्ट ते(दि.09)ऑगस्ट जनता कर्फ्यू ची कडक अंमलबजावणी होईल.

🔴03 ऑगस्ट ते 09 ऑगस्ट या कालावधीत फक्त दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, दूध व पाणी वितरण ,बँक व्यवहार व्यवस्था सुरू राहतील.

या जनता कर्फ्यू चे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे.
   या कालावधीत शहरात जास्तीत जास्त नागरिकांची covid-19 चाचणी करण्यात येईल यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतः उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे संपर्क साधून सहकार्य करावे. कारण तपासणीला घाबरून घरी बसणे हे आपल्या स्वतःसाठी व आपल्या कुटुंबीयांसाठी धोकादायक ठरू शकते. यासाठी काही अडचणी असतील तर संबंधित अधिकारी, उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार ,पोलिस निरीक्षक ,मुख्य अधिकारी ,वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा प्रशासनाचे आपणास सहकार्य राहील.

- नगरपरिषद पदाधिकारी ,लोकप्रतिनिधी, स्थानिक व्यापारी संघटना, नागरिक ,स्थानिक प्रशासन अशी व्हाट्सअप पोस्ट उपविभागीय अधिकारी यांनी शेअर केली आहे .त्यामुळे सोमवार दि.03ऑगस्ट पासून 09 ऑगस्ट पर्यंत कळंब शहरात जनता कर्फ्यु  असणार आहे.
 
Top