Views



कोरोना संकटातही जपली माणूसकी रक्षाबंधनाच्या पूर्वसंधेला युवकांनी घेतला एक आदर्श उपक्रम 
        
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
मुरुम शहरातील सोनार गल्लीतील श्रीराम जन्मोत्सव समितीचे सदस्य शिवम शर्मा यांच्या सौजन्याने व मित्र परिवाराच्या वतीने उमरगा चौरस्त्यावरील इंद्रधनु वृध्दश्रमात राहणाऱ्या माता - पित्यांना साडी - चोळी व धोती तेथे प्रत्यक्ष जावून दि.2 ऑगस्ट रोजी वाटप करण्यात आले. हा माणूसकीचा धर्म, नाते व सामाजिक बांधीलकीची भावना काय, असते असा आदर्श या युवकांनी घालून दिल्याची भावना येथे राहणाऱ्या ज्येष्ठ माता - पित्यांनी व्यक्त केल्या. या तरुणांना पुढेही आपण अशाच भूमिकेतून काम करण्यासाठी यावेळी शुभ आशीर्वाद दिले. यावेळी मारोती खमितकर, प्रा.अभयकुमार हीरास, शिवम शर्मा, प्रसाद पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे तालुका प्रमुख भगत माळी यांच्या उपस्थितीत साडी - चोळी व धोतीचे वाटप करण्यात आले. यावेळी नागेश कलकुर्के, दादा बिराजदार, गणेश डोंगरे, विकी कुलकर्णी, संकेत शिंदे, सोमनाथ स्वामी, आदिंनी पुढाकार घेतला.

 
Top