परंडा शहरातील मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. अन्यथा आम्ही उपोषणाला बसू- शेतकर्यांचे तहसीलदार यांना निवेदन....
परंडा:-(प्रतिनिधी)
परंडा शहारा लगत च्या शेतात गावातील मोकाट जनावरे घुसून पिंकांची नासधूस वारंवार करत असल्यामुळे सर्व शेतकरी यांनी परंडा तहसीलदार, तहसील कार्यालय परंडा, न .प. मुख्याधिकारी यांना गुरूवार(दि 20)रोजी निवेदन देण्यात आले आहे, तसेच निवेदनाद्वारे मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. अन्यथा आम्ही उपोषणाला बसू असे आंदोलकानी सांगितले.
यावेळी निवेदनावर रईस मुजावर ,महादेव मेहता, जाकिर मुजावर ,महादु माळी ,इरफान मुजावर ,मुस्ताक पल्ला ,पांडु खताळ ,नुरूद्दीन मुजावर ,निजाम मुजावर ,ज्ञानेश्वर खताळ ,मुलीज मुजावर यांच्या सह्या आहेत.