Views




ग्रंथालय विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप 


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दि.14 ऑगस्ट रोजी ग्रंथालय विभागाच्या वतीने प्रवेश घेणाऱ्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. मास्क वाटप कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांनी विद्यार्थ्यांना मास्क लावून सुरक्षित अंतर ठेवून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, उपप्राचार्य सुधीर अंबर, ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.राजकुमार देवशेट्टे, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, ग्रंथपाल भालचंद्र टाचले यांच्या हस्ते वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचारी विविध शाखेतील विद्यार्थी - विद्यार्थीनीना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी प्रा.सचिन राजमाने, प्रा. दयानंद राठोड, सुभाष पालापूरे, आनंद वाघमोडे, दत्तू गडवे, श्रीमती विजयालक्ष्मी भालेराव, सुरेखा पाटील, महावीर नारायणकर, दिलीप घाटे, चंद्रकांत पुजारी, मशाक कागदी, लालअहमद जेवळे, राजू कोळी आदींनी पुढाकार घेऊन मास्कचे विद्यार्थ्यांना वाटप केले.



 
Top