Views


कळंब च्या कर्तव्य दक्ष उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी बाजारपेठेत  बेजबाबदार लोकांवर केली कारवाई

कळंब:-(प्रतिनिधी)

कळंब च्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी  कोरोणा (कोवीड-19) संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन यांनी शहरातील बाजारपेठ पाच वाजता आदेशानुसार बंद करण्यात येत आहे. परंतु बाजारपेठ बंद झाल्यास काही व्यापारी आपले प्रतिष्ठाने जाणून बुजून बंद करण्यास उशीर करत आहेत.तर बाजारपेठ बंद झाल्यास काही टुकार लोक विनाकारण दुचाकीवरून शहरात फिरत आहेत.तसेच बाजारपेठ चालू असताना सोशल डिस्टंट चे पालन करत नाहीत, विनामास्क दुचाकीवर फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे शहरात बघायला मिळत आहे . कळंब तालुक्यासह शहर हे कोरोणा मुक्त झाले आहे.परंतु सोशल डिस्टंट न पाळत, विना मास्क, विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांन मुळे पुन्हा कोरोणा तालुक्यात व शहरात पुन्हा शिरकाव करून नये याची खबरदारी म्हणून कळंब च्या कर्तव्य दक्ष उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ ,नायब तहसीलदार असलम जामादार हे स्वत: हातात काठी घेऊन शहरात शिवाजी चौकात आपल्या कर्मचारी व पोलीस प्रशासन ला सोबत घेऊन बेजबाबदार लोकांवर कारवाई केली. 

 
Top