Views


येरमाळा ग्रामपंचयाने सोमवार ता.१३ च्या मध्यरात्री पासुन सात  दिवस म्हणजे ता.१९ च्या मध्यरात्री पर्यंत जनता कर्फ्यु ठेवण्याचा निर्णय

कळंब:-(प्रतिनिधी) 
     येथील कोरोना पाझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील तपासणी केलेल्या एका जनाचा रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने स्थानिक प्रशासन व ग्रामपंचयाने सोमवार ता.१३ च्या मध्यरात्री पासुन सात  दिवस म्हणजे ता.१९ च्या मध्यरात्री पर्यंत जनता कर्फ्यु ठेवण्याचा निर्णय घेतला.यात कसुर करणाऱ्यांवर कडक पोलीस कारवाई करण्यात येईल असाही ठराव आज ग्राम पंचायत मध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
येरमाळा येथील बार्शी येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेताना एकाचा कोरोना रिपोर्ट शनिवारी पोसिटीव्ह आला होता.त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कातील १२ जणांची रविवारी कळंब ग्रामीण रुग्णालयात कोरोना तपासणी केली होती.या पैकी २५ वयाचा एका मुलाचा रिपार्ट पझिटिव्ह आला.दोन रिपोर्ट येणे बाकी असुन इतरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.त्यामुळे गावात विषाणूचा संवसर्ग वाढुनये यासाठी आज ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाने सात दिवस गाव बंद ठेवण्याचा (जनता कर्फ्यु) निर्णय घेतला आहे.ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत खाजगी दवाखाने,मेडिकल वगळता कोणत्याही प्रकारची दुकाने उघडी राहणार नाहीत.या काळात कोणी या नियम विरुद्ध दुकान उघडले तर कडक पोलीस कारवाई करण्यात येईल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.बार्शी येथील उपचाराला गेल्याने गावात संवसर्ग झाला आहे.त्यामुळे गावातील दवाखाने याकाळात सुरु ठेवावेत जेणे करुन लोक बार्शीकडे जाणार नाहीत या बाबत सर्व खाजगी दवाखान्यांना लेखी नोटिस बजावल्या आहेत.
या बैठकीला सपोनि पंडित सोनवणे,वैद्यकीय अधिकारी सचिन तेलप,सरपंच विकास बारकुल,मंडळ अधिकारी डी. एम.कांबळे,ग्रामविकास अधिकारी अशोक आमले,सर्व ग्रामपंचायत सदस्य,गणेश बारकुल,जि.प.सदस्य मदन बारकुल,सुनील पाटील,लहू बारकुल,दशरथ जाधव,तानाजी सवणे,भास्कर काळासाईत, गावातील किराणा दुकानदार उपस्थित होते.

 
Top