Views


राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई दादर येथील निवासस्थान राजगृहावर काल अज्ञात हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

कळंब:-(प्रतिनिधी)

 राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई दादर येथील निवासस्थान राजगृहावर काल अज्ञात  हल्लेखोरांनी हल्ला केला त्याठिकाणी हल्लेखोरांनी बेशुमार दगडफेक करून देशातील अत्यंत ऐतिहासिक वास्तूचे नुकसान केले आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर करण्यात आलेली दगडफेक हि अत्यंत निषेधार्थ व घृणास्पद बाब आहे राज्यसरकारने तात्काळ राजगृहावरील हल्ल्याच्या संबंधित असलेल्या दहशतवादी लोकांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याशिवाय राजगृहाला व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटूंबातील सर्व सदस्यांना राष्ट्रीय दर्जाची झेड सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे  सरकारने या निवेदनावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल काही अनुचित प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची राहिल  निवेदनावर रिपब्लिकन सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व संभाजी ब्रिगेड व अन्य सामाजिक क्षेत्रातील लोकांनी सह्या केल्या आहेत अनिल हजारे रिपब्लिकन सेना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष प्रा डॉ संजय कांबळे , चेतनजी शिंदे ,लाखन गायकवाड , ॲड .आबासाहेब पायाळ, अँड. अनंत चोंदे , ॲड. मनगिरे, मुसदेक काझी, सुरज वाघमारे ,भैय्या धावारे हूजेत बागवान, सिध्दार्थ हजारे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते

 
Top