Views


राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धत उमरगाची व्हनमाने प्रिती प्रथम तर मुरुमची शिंदे पोर्णिमा द्वितीय क्रमांक पटकाविलाबद्ल मुरुमच्या माधवराव पाटील महाविद्यालयात सत्कार             

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाशी संबंधित विविध विषयांवरती ही स्पर्धा ऑनलाइनद्वारे घेण्यात आली होती. मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा २०२० चा निकाल जाहीर करून स्पर्धकांना बक्षीस देवून त्यांचा यथोचित सत्कार दि.24 जुलै रोजी महाविद्यालयात करण्यात आला. या स्पर्धत गुणानुक्रमे आलेल्या स्पर्धाकांचा प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते वैचारिक ग्रंथ, प्रशस्तीपत्र व पुष्पहार घालून स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सायबण्णा घोडके, डॉ.अरविंद बिराजदार, डॉ.संध्या डांगे, डॉ.भिलसिंग जाधव, प्रा.अशोक बावगे, राजू ढगे, एम.सी.पाटील, पालक लिंबाण्णा व्हनमाने, लखन शिंदे, विक्रम गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धत प्रथम क्रमांक कुमारी व्हनमाने प्रिती, श्रमजीवी अध्यापक विद्यालय, उमरगा (डी.एड. प्रथम वर्ष), द्वितीय क्रमांक शिंदे पोर्णिमा, श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम (बी.कॉम.तृतीय वर्ष), तृतीय क्रमांक गायकवाड अदिराज, श्रीकृष्ण महाविद्यालय, गुंजोटी (बी.एस्सी.प्रथम वर्ष), तर उत्तेजनार्थ राठोड बेलेश्वर, श्रमजीवी अध्यापक विद्यालय, उमरगा (बी.एड. प्रथम वर्ष) यांचा मान्यवरांच्या हस्ते सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून बक्षीस देवून सत्कार करण्यात आला. सदर ऑनलाईन स्पर्धत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील 18 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धचे समन्वयक प्रा.डॉ.महेश मोटे व सूत्रसंचालन, आभार प्रा.डॉ.सुभाष हुलपल्ले यांनी मानले.

 
Top