Views


खासदारांनी घेतली क्वारंटाईन सेंन्टरवरील अधिकारी व केंद्रप्रमुख यांची आढावा बैठक.

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
शासकीयविश्रामगृह,शिंगोली (उस्मानाबाद) येथे जिल्ह्यातील कोरंटाईन सेंन्टर वरिल विविध समस्या आल्या होत्या त्या अनुषंगाने आज कोरोना सेंन्टर वरती उपायोजना करण्या संदर्भात सर्व संबंधित अधिकारी व केंद्रप्रमुख यांची आढावा बैठक घेतली.
   जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात कोरोना सेंन्टर तयार करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात कोरोना सेंन्टर वरती संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी. तसेच दररोज सेंन्टर वर पिण्याचे पाणी, आंघोळी साठी गरम पाणी, उत्कृष्ठ नाष्ठा, पोटभर जेवण देण्यात यावे व सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. व सेंन्टर वर आलेल्या रुग्णांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा सूचना खासदार साहेबांनी देण्यात आल्या. याची सर्वस्वी जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांची राहील.  
     जिल्ह्यातील कुठल्याही सेंन्टर वरती अचानक मी स्वतः भेट देणार आहे. व जर सांगितले सूचनांचे पालन केलेले आढळून न आल्यास संबंधित तहसीलदार, केंद्रप्रमुख जबाबदार धरण्यात येईल. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला
   यावेळी आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, तुळजापूर व उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी  रामेश्वर रोडगे, कळंब व वाशी च्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, भूम व परंडा च्या उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर, सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.
 
Top