Views


उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील आठवड्यात कोविड लॅब चालू होणार: पालकमंत्री गडाख
     
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
 
(दि.16) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या  उस्मानाबाद येथील उपकेंद्रात जिल्ह्यातील दानशूर संस्थांच्या सहकार्यातून कार्यान्वित होत असलेली कोरोना चाचणी प्रयोगशाळा पुढील आठवड्यात जिल्हावशीयांच्या सेवेत सुरू होणार आहे. 
        जिल्ह्यातील सर्व बँका , पतसंस्था , नगर पालिका , साखर कारखाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या सहकार्यातून उस्मनाबाद येथील कोविड लॅबचे काम पूर्ण झाले असून पुढील आठवड्यात ही लॅब चालू होणार आहे. प्रयोगशाळेतील सर्व साहित्य पोचले आहे. त्याची जोडणी करण्याचे काम येथील अभियंते करत असून एक ते दोन दिवसात ते पूर्ण होत आहे. त्यानंतर यासाठी लागणारा प्रशिक्षित वर्ग विद्यापीठातील उपकेंद्रतूनच दिला जाणार आहे. त्यांचेही प्रशिक्षण पूर्ण होत असून पुढील आठवड्यात ही प्रयोगशाळा जिल्हावाशीयांच्या  सेवेत येत आहे. 
        त्यामुळे जिल्ह्याची इतरत्र चाचणीसाठी होणारी धावपळ थांबणार असून त्यासाठी आता केवळ एक आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मी स्वतः ही प्रयोगशाळा तात्काळ सुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी नित्यनियमाने संपर्क करीत आहे.  तसेच विद्यापीठातील  प्रयोगशाळेचे काम पाहणारे सर्व सहकारी यांच्याशी संपर्कात असून लवकरच उपकेंद्रातील ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल.
     कोरोणाचा संसर्ग कमी करायचाय, वाढवायचा नाही....
'घरीच रहा ;कोरोनाला टाळा' असं आपण सर्वांना सांगतो, आणि हेच योग्य आहे.  जर मी दौरा केला तर अधिकारी कर्मचारी हे सर्व एकमेकांच्या संपर्कात येतात. यातून कोरोनाचा संसर्ग रोखण्याऐवजी वाढू शकतो. त्यामुळे प्रमुख अधिकाऱ्यांची झूमआप द्वारे मीटिंग घेतो.  फोनवरून संपर्क करतो. असेही नाही एखादी फाइल माझ्या सहीमुळे राहिलेली आहे. त्यामुळे दौरा केलाच पाहिजे. सर्व कामे व्यवस्थित सुरू आहेत. जिल्ह्यात कोठेही कोणाची तक्रार नाही. त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर मी प्रत्येक तालुकानिहाय दौरा करणारच आहे. 
    गेल्या एक महिन्यापासून माझ्या कुटुंबातील सदस्याचे आजारपणाच्या विविध टेस्ट अहमदनगर, पुणे, चेन्नई व मुंबई येथे चालू असल्याने एक महिन्यापासून मी जिल्ह्यात येऊ शकलो नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु, सर्व सामान्य जनतेला अडचण येऊ नये. म्हणून मी 
जिल्हा प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधींच्या व जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या संपर्कात आहे. तसेच फोनद्वारे अनेकांच्या कामाचा पाठपुरावा चालू होता. एखाद्या ठिकाणी आर्थिक अडचण असेल किंवा अन्य कोणती अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी त्याचा पाठपुरावा करीत आहे. आई तुळजाभवानीच्या कृपेने कुटुंबातील आरोग्याचा प्रश्न पार पडेलच. परंतु अनेकांना माझ्या कुटुंबातील आरोग्याचा प्रश्न माहीत असूनही त्यांनी खालच्या पातळीचे राजकारण केले याचा खेद वाटतो. शेवटी, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. त्यामुळे पुढील आठवड्यात प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार आहे. 
          सध्या जगात व राज्यासमोर कोविडचे मोठे संकट उभे असून सगळी यंत्रणा याचा मुकाबला करीत आहे. आपल्या सर्वांना एकत्र येऊन या महामारीचा मुकाबला करायचा आहे. आपल्या जिल्ह्यात कोविड चे रुग्ण वाढल्याने सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा नियोजन समितीमधून सामान्य रुग्णालय व आयुर्वेदिक कॉलेजसाठी सुमारे साडे सहा कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला असून चालू वर्षीही कोरोनासाठी रु. २२ कोटींची तरतुद केलेली आहे.
  पालकमंत्री झाल्यापासून.....
        प्रत्येक महिन्यात किमान एक बैठक घेतलेली आहे. दि. १५ मार्चला विधानसभेचे अधिवेशन संपल्याबरोबर दि. १७ मार्च रोजी पालकमंत्री म्हणून सगळ्यात पहिली बैठक उस्मनाबादची झालेली आहे. तेव्हापासून सुमारे ४ बैठका घेतल्या आहेत. 
         सन २०२० ची जिल्हास्तरीय खरीप हंगामपुर्व आढावा राज्यांत सर्वात पहिली उस्मनाबाद जिल्ह्यात मी घेतली. शेतक-यांच्या बांधावर खते व बी बियाण्यांचे वाटप, बियाणे व खतांच्या उपलब्धतेचा प्रश्न, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न , पाणी प्रश्न यात लक्ष घातले आहे.  बोगस बियाण्यांच्या सुमारे ७५६८ प्राप्त आहेत. यापैकी सुमारे ७५३१ ठिकाणी पंचनामे करण्यात आलेले आहेत. कृषिधन सीड्स, green gold, Basant Agroteck, वरदान, सालासर आणि पतंजली या ६ कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केलेले असुन पोलीस तपास करीत आहेत. 
      जिह्यातील रेशन वाटप व्यवस्थेत सुरवातीला अनेक समस्या होत्या. परंतु, यात मी जातीने लक्ष दिले. स्वस्त धान्य पुरवठा सुरळीत करून गावातील तसेच वाड्या वस्त्यावरील गरीब कुटुंबा पर्यंत कसे याचे वाटप होईल यात लक्ष दिले. शनैश्वर देवस्थानच्या वतीने जिल्ह्यात २५ टन अन्नधान्याचे वाटप जिल्ह्यातील गोरगरिबांना केलेले आहे. 
      उस्मानाबाद जिल्ह्यातील यापुर्वीची परिस्थिती व माझी उपलब्धी जिल्हावासियांच्या समोर आहे. आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरीता मी कटिबद्ध आहे.

 
Top