Views


येरमाळा येथिल जनहित परिवाराकडून कळंब येथील स्फुर्ती फाउंडेशन, येरमाळा येथील पोलीस कर्मचारी, अधिकारी,आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, अदिंना, कोरोणा योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

कळंब:-(प्रतिनिधी)
येरमाळा येथील जनहित पतसंस्थेच्या परिवाराच्या दि.6 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता संस्थेच्या 15  व्या वर्धापना दिनानिमित्त येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्रात  यावेळी कळंब येथील स्फुर्ती फाउंडेशन, येरमाळा येथील पोलीस कर्मचारी, अधिकारी, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी मदतनिस, महसुल कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, बँका, महावितरण कंपणी, ग्रामपंचायत, संस्था, ट्रस्ट, यांच्यासह सदस्य पदाधिकाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवून घेण्यात आला. यावेळी प्रमुख म्हणून
माजी सैनिक अशोकराव माशाळकर, ह.भ.प.दत्तात्रय बोधले महाराज, ज्ञानप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. अंकुशराव पाटील, प्रा.सुनिल पाटीलयेडाई व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ.संदीप तांबरे, जनहित संस्थेचे संस्थापक संतोष तौर,संस्थेचे संचालक दत्ता रणसिंग, सुनिल शिंदे, व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे, अदि, उपस्थित होते. यावेळी कळंब येथील स्फुर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव गिड्डे पाटील, सचिव मकरंद पाटील, आदिना, मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वल्लभ माशाळकर यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक, व्यवस्थापक, यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थीत होते.

 
Top