Views


महायुतीचे परंडा तालुका यांच्यावतीने राज्य शासनास दुध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर शासनाला दुध भेट व निवेदन

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटांत सापडला असुन दुधाचे भाव 16 ते 18 रुपयांर्पंत घरसले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना संकटामुळे दुध संकलन होत नसल्यामुळे दुध उत्पादक शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या शेतक-यांना दुधाचा योग्य तो दर मिळत नाही. राज्य सरकारने दुध उत्पादक शेतक-यांसाठी घेतलेले निर्णय हे केवळ ठरावीक दुध संघापुरतीच मर्यादित असुन राज्यभरातील अन्य दुध उत्पादकांवर अन्याय होत आहे. म्हणुन या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि.20 जुलै 2020 रोजी महायुतीतील सर्व घटक पक्ष भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट),  रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना, यांनी एकत्र येऊन राज्यातील दुध उत्पादक शंतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनास दुध भेट व निवेदन दिले.
1) दुध उत्पादक शेतक-यांना प्रति लिटर 10 रु. अनुदान देऊन थेट शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे.
 2) दुध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो 50 रु. अनुदान द्यावे.
 3) गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रु. दर द्यावा.
 या प्रमुख मागण्या असुन या मागण्या मान्य न झाल्यास महायुतीचे दि. 1 ऑगष्ट 2020 रोजी तिव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली परंडा महायुतीच्या यांच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. या निवेदनावर आर.पी.आय प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, भाजपा  सरचिटणीस गणेश खरसडे, रासप तालुकाध्यक्ष बप्पा काळे फकीरा सुरवसे, शिवाजी माने, भाजपा शहराध्यक्ष अॅड.जहीर चौधरी, अॅड.गणेश खरसडे, विठ्ठल तिपाले, रमेश पवार, निशिकांत क्षिरसागर, बिभीषण हांगे, तुकाराम हजारे, राहुल कारकर, साहेबराव पाडुळे, किरण देशमुख, प्रमोद लिमकर, सारंग घोगरे, अरविंद रगडे, शिवाजी पाटील, डॉ. अमोल गोठणे, विनोद पाटील, बाळासाहेब गोडगे, महादेव बारस्कर, ब्रम्हदेव उपासे, सागर पाटील, सुभाष लटके, विष्णु गायकवाड, धनंजय काळे, आदींच्या सह्या आहेत.

 
Top