Views


लोहारा नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांनी नियम मोडणाऱ्या 29 जणांकडून दंड वसूल केला

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)

राज्य सरकाने लॉकडाउनची मुदत वाढवताच लोहारा नगरपंचायत, पोलिस प्रशासन अॅक्टिव्हमूडमध्ये आले असून मंगळवारी दि. 30 जून रोजी मास्क न वापरणारे, दुचाकीवर डबलसीट फिरणाऱ्या शहरातील 29 जणांवर दंडात्मक कारवाई करत चार हजार 3000 रूपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कोरोना विषाणूंला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता नागरिकांना दिली असली तरी सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, याबाबत वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. परंतु याला न जुमनता काही नागरिक शहरात मोकाट फिरत आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेला खीळ बसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउनची मुदत वाढवली आहे. पोलिस प्रशासन, नगरपंचायतकडून तोंडाला मास्क न वापरणारे व दुचाकीवर डबलसीट मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी या कारवाईस सुरवात झाली आहे. मुख्याधिकारी गजानन शिंदे स्वत: दंडात्मक कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. छत्रपती शिवाजी महारज चौक, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणच्या प्रमुख मार्गावर तोंडाला विना रुमाल, मास्क फिरणाऱ्या 15 जणांवर दंडात्मक कारवाई करून दिड हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच दुचाकीवर दोघे जण फिरणाऱ्या 14  जणांऱ्याकडून  दोन हजार आठशे रूपयांचा दंड वसूल केला आहे. दिवसभरात 29 जणांवर कारवाई करत चार हजार 3000  रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे, अफजलोद्दीन शेख, पी. पी. पोते, दीपक मुंडे, कमलाकर मुळे, बाळू सातपुते, श्रीशैल्य मिटकरी, मल्लिनाथ बिराजदार, गणेश काडगावे, नवनाथ लोहार,पप्पू भरारे आदी कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

 
Top