Views


सलगरा या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  गावास भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला आला.

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

    तुळजापूर तालुक्यातील सलगरा या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  गावास भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला आला.गावांतील नागरिकांशी चर्चा करून धीर देत  घाबरून न जाता प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले. तसेच गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आर्सेनिक अल्बम- ३० या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथी औषधांच्या गोळ्यांचे वाटप करण्यासाठी कार्यकर्त्यांन कडे सुपूर्द करण्यात आल्या. वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी सतर्क रहावे अशा सूचना दिल्या.
    यावेळी तहसिलदार श्री.सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी श्री. प्रशांतसिंह मरोड, श्री.संतोष मुळे, तलाठी, ग्रामसेवक, कोरोनाकक्ष समितीचे सर्व सदस्य, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top