Views


उस्मानाबाद जिल्हा मध्ये आणखी पाच नवीन कोरोणा रूग्ण आढळले  


उस्मानाबाद  (सैफोदीन काझी) -

 उस्मानाबाद जिल्ह्यात पाच जणांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. सर्वच्या सर्व रुग्ण लक्ष्मीनगर, भूम येथील असून, पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. दरम्यान, आतापर्यंत 159 कोरोना रुग्ण सापडले असून, पैकी 125 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच जणांचा मृत्यू झाला असून, केवळ 29 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील 47 जणांचा स्वॅब बुधवार(दि.17) तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे पाठवण्यात आला होता, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून, पैकी पाच पॉजिटीव्ह तर 42 निगेटिव्ह रिपोर्ट आहेत. पाच पॉजिटीव्ह रुग्ण लक्ष्मीनगर, भूम येथील असून, पूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी माहिती दिली .
  
   उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट एकूण बाधित रुग्ण - 159 बरे झालेले रुग्ण - 125 मृत्यू पावलेले रुग्ण - 5 ऍक्टिव्ह रुग्ण - 29

 
Top