Views
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोठावळे यांनी अनाथ दोन मुली घेतल्या दत्तक व स्विकारली पालकत्वाची जबाबदारी

कळंब:-( प्रतिनिधी )

   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब येथील संत ज्ञानेश्वर माऊली निराधार बालकांना फळे वाटपाचा कार्यक्रम मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कोठावळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसेचे जिल्हा संघटक अमर राजे कदम परमेश्वर. जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे. शेतकरी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष प्रभाकर धुमाळ. तालुका सचिव अशोक दशवंत. विधानसभा अध्यक्ष जलालभाई शेख. परंडा तालुका अध्यक्ष बापु क्षीरसागर. सलीम औटी आदी उपस्थित होते.
    यावेळी माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोठावळे यांनी आश्रमातील अश्विनी व रुपाली या दोन मुलींना दत्तक घेतले व पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून शालेय साहित्य व कपडे वाटप वरिल पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर धुमाळ यांनी तर आभार अशोक दशवंत यांनी मानले.

 
Top