Views


खासदार.ओमराजे निंबाळकर यांनी कृषी विभागाची आढावा बैठक घेऊन उगवून न आलेल्या सोयाबीन बियाणेचे तात्काळ पंचनामे करणेच्या सूचना केल्या 

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

 उस्मानाबाद येथील शासकिय विश्रामगृह मध्ये  शनिवार (दि.२०)कृषी विभागाची आढावा बैठक खासदार. ओमराजे निंबाळकर यांनी  घेऊन उगवून न आलेल्या सोयाबीन बियाणेचे तात्काळ पंचनामे करणेच्या सूचना केल्या. पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बाजारात विविध कंपन्याचे तसेच अनेकांनी घरगुती बियाणे खरेदी करून पेरणी चालू केली आहे. मान्यता प्राप्त कंपनीचे खरेदी केलेले बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी  आल्या आहेत. त्यामुळे उगवण क्षमता नसलेले बियाणे विक्रीस आल्याचे निदर्शनास आले आहे. उगवण न झालेल्या सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अशा सूचना  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  दिल्या. 
    या बैठकीस आ.कैलास घाडगे-पाटील, उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष नंदू भैय्या राजेनिंबाळकर, उपविभागीय कृषी अधिकारी कोळेकर, जि.प कृषी अधिकारी निरडे, तालुका कृषी अधिकारी  डी.आर जाधव,पं. स कृषी अधिकारी  राऊत, नगसेवक सोमनाथ गुरव, आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
Top