*व्हाईस ऑफ मीडिया अभिनव उपक्रम*
कळंब/प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुक काळात मोलाची जबाबदारी पार पाडत पूर्ण वेळ देऊन केलेल्या कामाचे कोठेतरी कौतुक व्हावे या प्रांजळ हेतूने कळंब धाराशिव विधानसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडणारे निवडणूक अधिकारी कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील तसेच कळंब चे तहसीलदार हेमंत ढोकले कले त्याचप्रमाणे कळंब पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रवी सानप यांचा कळंब व्हॉइस ऑफ मीडिया वतीने पुष्पगुच्छ व्हॉइस ऑफ मीडियाचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्यवाहक अमर चोंदे कळंब व्हाइस ऑफ मीडियाचे कार्याध्यक्ष रामरतन कांबळे, उपाध्यक्ष शिवप्रसाद बियाणी ,प्रसिद्धीप्रमुख दीपक माळी, येरमाळा येथील व्हॉइस ऑफ मीडियाचे दीपक बारकुल, दत्तात्रेय बारकुल, सुधीर लोमटे, बालाजी बारकुल, संतोष बारकुल ,सचिन बारकुल, कळंब येथील सलमान मुल्ला, राहुल गाडे, राजेंद्र कांबळे, आधी वाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.