*कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन ऊर्स साजरा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना*
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
दर्गा हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी (रहे) यांचा वार्षिक ऊर्स दि. 14 ते 23 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये साजरा करण्याबाबत केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने कोविड-19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन आणि मार्गदर्शक सूचनांनुसार 50 भाविकांच्या उपस्थितीमध्ये ऊर्स साजरा करण्याबाबत कळविण्यात आले होते.
तथापि, दि. 14 ते 23 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये दर्गा हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी (रहे) यांचा वार्षिक ऊर्स साजरा करताना कोविड-19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन तसेच आदेशातील मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्याच्या अटीवर मुख्य संदल मिरवणुकीमध्ये 200 भाविक आणि इतर कार्यक्रमांमध्ये 500 भाविकांच्या उपस्थितीमध्ये ऊर्स साजरा करण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे.