Views


*जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 14 अर्ज प्राप्त*



उस्मानाबाद/ प्रतिनिधी


जिल्हास्तरीय लोकशाही दिन अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले-डंबे यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातील या लोकशाही दिनात 14 अर्ज प्राप्त झाले होते .
यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी आधळे, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे,जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, पोलीस अधीक्षक कार्यालयातील पी.के.शिंदे,सहायक जिल्हा निबंधक पी.के.अंत्रेडी,महावितरणचे मुख्य अभियंता कय्युम मुलानी,जिल्हा अग्रणी बँक अधिकारी मुकेश कुमार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जी.आर.परलीकर,उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक मोटार वाहन निरीक्षक संजय नकाते आदी उपस्थित होते.                              
  यावेळी प्राप्त झालेल्या 14 अर्जनमध्ये कृषी, वीज वितरण कंपनी , सार्वजनिक बांधकाम विभाग,पाणंद रस्ते,विज जोडणी आणि महसूल आदी या विभागांशी संबंधित आहेत. तक्रारदाराच्या अर्जावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी.अशा सूचनाही श्रीमती आवले-डंबे यांनी यावेळी दिल्या.
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी,अडचणी यांची न्याय आणि तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपायोजना म्हणून जिल्हा स्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्यांच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येतो.
                                    
 
Top