Views


*आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न*



कळंब /प्रतिनिधी

    ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत साजरा होत असलेल्या आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) चा एक भाग म्हणून दिनांक ०३ ऑक्टोबर २०२१ रोजी नगर परिषद कार्यालय कळंब या ठिकाणी कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

   सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष विधीज्ञ श्री. मंदार मुळीक यांनी करून उपस्थितांना कार्यक्रमाचे स्वरूप सांगितले. तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब श्री महेश ठोंबरे सर यांनी उपस्थितांना विधी सेवा प्राधिकरण यांचेमार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सेवा याबाबतची माहिती देऊन हुंडा प्रतिबंधक कायदा, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिनियम २००९, कामगारांचे हक्क, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा इत्यादी कायदेविषयक बाबींवर बहुमूल्य मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे केवळ कायदे विषयक माहिती नसल्याने सर्वसामान्य नागरिक न्यायापासून वंचित राहणार नाही, यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध सेवा पुरविल्या जात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री मंदार मुळीक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. सदरील कार्यक्रमासाठी कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. यशवंत जाधव साहेब, विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष विशाल दुगाने, न्यायालयीन कर्मचारी इरफान मुल्ला, संतोष भांडे, विधिज्ञ बंडू कोळपे, नलावडे, जाधवर, पाटील, नगरपरिषद कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 
Top