Views


*मागास प्रवर्ग ठरवुन मराठा व ओबीसी आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मंजुर केल्याने मोदी सरकारचे भाजपा परंडा तालुक्याच्या वतीने अभिनंदन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

मागास प्रवर्ग ठरवुन मराठा व ओबीसी आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मंजुर केल्याने मोदी सरकारचे भाजपा परंडा तालुक्याच्या वतीने अभिनंदन केले आहे. 102 च्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राहत नसल्याने नमुद करत मा.सर्वोच्च न्यायालयाने मराठा व ओबीसी आरक्षण रद्द केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने विधेयक आणून राज्यांना पुन्हा एकदा हा अधिकार देण्याचे निश्चित केले आहे. त्याबद्दल मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व पुर्ण मंत्रिमंडळाचे भाजपा परंडा तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
 
Top