Views


*अप्पर जिल्हाधिकारी यांची भारतमाता मंदिर प्रकल्पास सदिच्छा भेट*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

  लोहारा येथील रा.स्व.संघ, जनकल्याण समिती संचलित भारतमाता मंदिर प्रकल्पास दि.20 ऑगस्ट 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर मंदिर प्रकल्पा तर्फे मान्यवरांना शॉल, श्रीफळ व भारतमातेची प्रतिमा देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सुरुवातीस प्रकल्पाचे पूर्णवेळ कार्यकर्ते शंकर जाधव यांनी प्रकल्पाचा सविस्तर परिचय करून दिला. यानंतर आवले मॅडम आपले मनोगत मांडताना म्हणाल्या की, भूकंपग्रस्त भागात मंदिर प्रकल्पाचे कार्य मागील 27 वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य सुरू असून प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील मुला- मुलींना सुसंस्कार व देशभक्तीचे धडे देवून समाज परिवर्तनाचा वसा उचलला आहे तसेच भुकंपसरख्या भीषण नैसर्गिक आपत्तीमधून लोकांना बाहेर काढून त्यांचे मनोबल वाढविण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. या प्रकल्पास भविष्यातही प्रशासनाचे सहकार्य लाभेल असे आश्वासन देवून पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी लोहारा तालुक्याचे तहसीलदार संतोष रुईकर, लोहारा न. पं.चे मुख्याधिकारी गजानन शिंदे, कक्षाधिकारी जगदीश सोंडगे, जिल्हा कार्य वाह कृष्णाजी मसलेकर, शंकर जाधव, कल्याण जोशी, राजेश परदेशी, संतोष गवळी,शहाजी जाधव, श्रीनिवास माळी, व्यंकटेश पोतदार, विरेश स्वामी, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top