Views


*लोहारा शहरातील प्रभाग क्र.5 मध्ये फवारणी ट्रॅक्टर यंत्राचे उद्घाटन पालकमंत्री ना.शकंरराव गडाख यांच्या हस्ते*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरातील प्रभाग क्र.5 मध्ये फवारणी ट्रॅक्टर यंत्राचे उद्घाटन पालकमंत्री ना.शकंरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. लोहारा शहरामधे कोरोनाचे उद्रेक कमी होताच डेंग्यु या आजाराने थैमान घातले आसुन या आजाराचे अनेक रुग्ण आढळुन येत असल्याने लोहारा शहरातील शिवसैनिक हाजी अमीन सुंबेकर यांनी स्वखर्चातुन प्रभाग क्र.5 मध्ये डासाचे प्रमाण कमी व्हावे व नागरीक या आजारापासुन सुरक्षित रहावे, या हेतुने फवारनी करून घेत आहेत. या फवारणी ट्रॅक्टर यंत्राचे उद्घाटन पालकमंत्री शकंरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड, आ.ज्ञानराज चौगुले, शिवसेना युवा तालुका प्रमुख अमोल बिराजदार, तुळजापूर शिवसेना उप तालुका प्रमुख शंकर लोभे, जिल्हा सहकार बोर्ड अविनाश माळी, हाजी आमिन सुंबेकर, माजी नगरसेवक अभिमान खराडे, महेबुब फकीर, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, ज्ञानोबा शिंदे, अमिन कुरेशी, सलीम कुरेशी, बाबा कुरेशी, हमीद शेख, सादिक फकीर, शाम नारायणकर, नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन शिंदे, ओ.एस. जगदिश सोंडगे, आदि उपस्थित होते.
 
Top