Views




*तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 6 जून शिवस्वराज्य दिन"उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नरसिंग जाधव सिनेट सदस्य प्रा.संभाजी भोसले,प्रो.डॉ.गोविंद काळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी जेटीथोर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार, पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केले आणि अभिवादन केले. यावेळी महाविद्यालयातील प्रा.डॉ.श्रीरंग लोखंडे, प्रा.डॉ.ब्रहस्पती वाघमारे, प्रा. डॉ. कार्तिक पोळ, प्रा.सत्यवान मुसळे, प्रा.रामलिंग थोरात, प्रा.कुमार खेंदाड, प्रा.आमोद जोशी, शाहूराज घोडके.हणमंत भुजबळ, मुळे, महादेव जाधव तसेच प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top