Views


उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर शहरात दि. 22 ते 29 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू......

उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

 दि.22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2020 पर्यंत तुळजापूर शहरात जनता कर्फ्यू लोक डाऊन लावण्याचा निर्णय झाला आहे. तुळजापूर नगर परिषद येथील सर्व नगरसेवकांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये तुळजापूर शहरात कोणाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व ही साखळी तोडण्यासाठी तुळजापूर नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांनी दि.22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2020 पर्यंत जनता कर्फ्यू  (लाँकडाऊन)करण्याबाबत निर्णय घेतला आहे. 
उपस्थितीत नगराध्यक्ष सचिन रोजकरी,विनोद पिंटू गंगणे, नगरसेवक अमर मगर,रंजीत इंगळे, औदुंबर कदम, किशोर साठे, अभिजित कदम, नानासाहेब लोंढे, नागेश नाईक ,पंडितराव जगदाळे, राजाभाऊ देशमाने ,राहुल खपले, बापूसाहेब काणे, विजय कंदले,विनोद पलंगे आदी उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने दवाखाने , मेडिकल,रुग्णालय शेजारचे मेडिकल, दुकाने वगळता व दुधासाठी सकाळी आठ ते नऊ कालावधी वगळता सर्व दुकाने सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय, किराणा दुकाने, भाजीपाला, मार्केट ,पेट्रोल पंप, सर्व बँका इत्यादी सर्व प्रकारच्या आस्थापने बंद राहतील. 
त्याचप्रमाणे दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन विनाकारण फिरणारे 2000 रुपये दंड आकारण्यात येईल येईल. तसेच विना मास्क लावता फिरण्यास १००० रुपये दंड आकारण्यात येईल.
तरी सदरील कालावधीमध्ये सर्व जनतेने जनता कर्फ्यू लोक डाऊन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. विनाकारण घराच्या बाहेर पडू नये घरी राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोजकरी यांनी केले आहे.
 
Top