Views


सामाजिक अंतर व नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी द्यावी, यासाठी भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टंसिंग, फेस मास्कचा वापर करून आपापल्या कार्यक्षेत्रात घंटानाद आंदोलन करावे -- आ.सुजितसिंह ठाकूर

लोहारा:-( इकबाल मुल्ला)
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत् करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील माॅल, मांस, मदिरा 'पूनःश्च हरी ओम' च्या नावाखाली सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात 'हरी' ला मात्र बंदिस्त ठेवले आहे. संतभूमी महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरू आहे. आणि भजन पूजन करणारे भाविक भक्तांवर गुन्हे दाखल दाखल होत आहेत. भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे. महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होते आहे. केंद्र सरकारनेही 4 जून 2020 रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांतून होते आहे. मात्र पूनःश्च हरी ओम म्हणून हरीलाच बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे. सामाजिक अंतर आणि नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी. या मागणीकडे निद्रिस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील संत, महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, अध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थाने, तीर्थक्षेत्रे येथील उदरनिर्वाह निगडीत असलेले व्यावसायिक शनिवार दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्यात सर्वत्र देवस्थाने, मंदिरे, धार्मिक स्थळांसमोर 'घंटानाद आंदोलन' करणार आहेत. 'दार उघड उद्धवा दार उघड', 'दारू नको भक्तीचे दार उघड', 'मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद', 'भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल', असे या घंटानाद आंदोलनाचे स्वरूप असणार आहे. या घंटानाद आंदोलनास महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे.
तरी भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टंसिंग, फेस मास्कचा वापर करून आपापल्या कार्यक्षेत्रात संबंधितांशी संपर्क व नियोजन करून या 'घंटानाद आंदोलन' मध्ये सक्रीय सहभागी व्हायचे आहे. आपण सहभागी झालेले वृत्त, छायाचित्रे लागलीच 8657718280 या व्हाटस्अप वर तसेच bjpmaha@
gmail.com यावर पाठवावे, असे भाजप प्रदेश सरचिटणीस आ‌. सुजितसिंह ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.


 
Top