Views


कॉग्रेस सेवादल सभासद नोंदणी घोगरे यांच्या हस्ते प्रारंभ 

(कळंब प्रतिनिधी ) 
अखिल भारतीय कॉग्रेस ( आय ) सेवादला मार्फत चालू असलेल्या सभासद नोंदणी अभियानाची सुरूवात कळंब येथे कॉग्रेस सेवा दलाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय घोगरे यांच्य हस्ते प्रारंभ करण्यात आला 
   अधिक वृत्त असे की संपूर्ण देशात कॉगेंस ( आय ) सेवादलाच्या वतीने कॉग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी सेवादल सभासद अभियानाची सुरुवात  स्व. राजीव गांधी जयंती दिनी झाली. त्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा कॉग्रेस ( आय ) सेवा दलाचे सभासद नोंदणी अभियानाची सुरूवात कळंब तालूक्यातून करण्यात आली. कॉग्रेस सेवादलाच्या वतीने स्व. राजीव गांधी जयंती साजरी करून नंतर  कार्यक्रमात कॉग्रेस सेवादलाचे प्रदेश सचिव संजय घोगरे, यांच्चा हस्ते सेवा दल सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात  करण्यात आली यावेळी सेवा दलाचे कळंब ता. अध्यक्ष पोपट आंबिरकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शेळके, किशोर घोगरे,प्रेमचंद कांबळे, सज्जन वाघमारे, इरशाद शेख, इनुस शेख, समाधान यादव, अजिंक्य घोगरे, धिरज घोगरे  यांच्या सह कॉग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

 
Top