Views


आता तरी सावध राहा, कोरोना काळ दारात आलाय पहा.
 
कळंब:-(दिलीप झोरी)
तालुक्यातील मोहा गाव सध्या तरी कोरोना वाँरियर्सच्या मेहनतीने सुरक्षित आहे. परंतु निश्चिंत राहु नका. चायनीज व्हायरस दारात उभा आहे. सावध, सुरक्षित, व स्वछ, आणि स्वस्थ राहा. कारण हा व्हायरस मेड इन चायना चले तो चांद तक नही तो शाम तक. बेफिकीर न राहाता स्वतःहाची, कुटुंबाची, गावाची, राज्याची त्याचबरोबर देशाची काळजी घ्या. चीनमध्ये आहे आपल्याकडे तर नाही, मुंबई, पुण्याला आहे आपल्या कडे तर नाही, उस्मानाबाद,कळंब ला आहे आपल्या कडे नाही. शिवावरच्या तर गावात आहे आपल्या तर गावात नाही. शेजारच्या गल्लीत आहे आपल्या नाही, शेजारच्याना झाला आपल्याला तर नाही 
असे म्हणत आपण आतापर्यंत फार गाफील राहिलो. आणि त्या चायनीज व्हायरसला तेच पाहिजे ते आपण ऐकत राहिलो, तर कृपया सावध व सुरक्षित रहा आपल्या शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुया, कोरोनाला हरवू या. 
         मोहा गावची लोकसंख्या जवळजवळ दहा हजारांवर असुन कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेरगावाशी संबध येतोच अथवा बँकेच्या कामानिमित्त किंवा किराणा मालाच्या निमित्ताने परिसरातील लोकांचा वावर असतोच. तरीही गावातील नागरीकांच्या तसेच सरपंच राजु भैय्या झोरी, ग्रामविकास अधिकारी लोकरे, 
पोलिस पाटील प्रकाश गोरे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता पाटील, उपाध्यक्ष अंकुश मडके व कोरोना वाँरियर्स यांच्या सजगतेने व सावधानतेने आज मोहा गाव कोरोनामुक्त आहे. याबाबत त्यांचे धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. पोलिस प्रशासनाची ही धावती भेट असते. अधून मधून येतात, काटी आपटतात, फेरफटका मारतात, विनाकारण व मास्कशिवाय फिरत असल्याचे दिसुन आल्यास झोडतात, मारतात, निममाचे पालन न करणारा सापडलाच तर पावती मात्र लवकर फाडतात. हे काम चोख करुन जातात. त्यांचाही कोरोना मुक्तीमध्ये सिंहाचा वाटा आहे असे जनतेतून बोलले जात आहे. 
         सध्या तरी गाव सुरक्षित आहे आणि ते राहिल. यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून गावातील सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती, कोरोना वाँरीयर्सनी एक बैठक घेऊन मंगळवारी व बुधवारी दि. ११ आणि १२/८/२०२० रोजी मोहात जनता कर्फु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असून जनतेने या जनता कर्फुला प्रतिसाद द्यावा असे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरीकाना आवाहन करण्यात आले आहे.

 
Top