Views


जिल्ह्यात अनुसूचीत जातींचे सर्वेक्षण सुरू
'बार्टी ' मार्फत नामशेष होणार्‍या सद्य:स्थितीचा अहवाल सादर होणार
 
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबडेकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर नामशेष होणार्‍या 59 अनुसूचीत जातींचे सर्वेक्षण सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 7 समतादुतामार्फत 622 गावांचा सर्वे करण्यात येत आहे. याचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. हा सर्वे अनुसूचीत जातींच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी करण्यात येत आहे.
त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचीत जातीमधील समाविष्ट 59  जातीपैकी महार, मांग, चांभार, ढोर, मेहतर, वाल्मिकी, अशा मोजक्याच जातीबाबत माहिती आहे. परंतु या जाती व्यतिरिक्त 59 मधील काही जाती महाराष्ट्र राज्यातून नामशेष होताना दिसून येत आहेत. म्हणून अशा जातींचा शोध घेऊन त्याची सद्य परिस्थिति जाणून घेऊन संशोधन अहवाल शासनास सादर करणात येणार आहे. त्यामुळे या इतर जाती देखील विकासाच्या प्रवाहात येतील. जिल्ह्यात 7 समतादुतामार्फत गावनीहाय 59 अनुसूचीत जातींचे सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 410  गावातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांचे सहकार्य मिळत आहे. कोरोंनामुळे समतादूत सुरक्षित अंतर ठेऊन व सानिटायझरचा वापर करून सर्वेक्षण करत आहेत. त्यामध्ये लोहारा व उमरगा तालुक्यात नागनाथ फुलसुंदर व किरण चिंचोले हे समतातादूत हे कार्य करत आहेत. नामशेष होणार्‍या 59 अनुसूचीत जातींना इतर जातींच्या प्रवाहात येण्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे (भा.पो. से ), बार्टीच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, दिलावर सय्यद, कीर्ती शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण काम सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात हे काम आघाडीवर आहे, अशी माहिती तुषार अनंत कदम, जिल्हा प्रकल्प अधिकारी बार्टी उस्मानाबाद यांनी दिली.
 
Top